शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या मंत्र्यांकडून मागवला कामाचा अहवाल; योग्यता सिद्ध करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 11:01 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे.

मुंबई, दि. 11- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवलं असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत तुमची योग्यता आणि उपयोगिता सिद्ध करा, जनहिताचे काय निर्णय घेतलेत ते सांगा, अशी तंबीच त्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतं आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा 'केआरए' पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचं समजतं आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरं मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरं तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वर्षं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो. 

तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केलं?  गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेलं काम श्रेष्ठ कसं ठरतं? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेलं नाही, असं मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना विचारले असल्याचं समजतं आहे. 

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस