शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आवडतील - आमदार संतोष बांगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 18:07 IST

बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला.

मुंबई - शिवसेना कुणाची? हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. त्यात धनुष्यबाण आणि शिवसेना नाव शिंदेंना मिळणार की ठाकरेंना याचा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे यांच्याजवळील पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे पक्षातंर्गत निवडणुका घेऊन पुन्हा हे पद स्वत:कडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. त्यात आता शिवसेना पक्षप्रमुखपद एकनाथ शिंदेंना मिळालं तर आनंद होईल असं विधान आमदार संतोष बांगर यांनी केले आहे. 

आमदार संतोष बांगर म्हणाले की, शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची जी निवड आहे त्यात महाराष्ट्राचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर ते आम्हाला निश्चितपणे आवडणार आहे. धनुष्यबाण चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे मत आहे. बाळासाहेबांनी जिवाचं रान केले, रक्ताचं पाणी केले आणि शिवसेना नावलौकाला आणली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला धनुष्यबाण मिळेल असा दावा त्यांनी केला. 

३० जानेवारीला ठरणार शिवसेना कुणाची?शिवसेना कुणाची? या प्रश्नाचे उत्तर अद्यापही आले नसून ठाकरे व शिंदे गटांनी केलेले युक्तिवाद संपले आहेत. येत्या ३० जानेवारीला दोन्ही गटांना निवडणूक आयोगासमोर लेखी निवेदन सादर करावयाचे आहेत. आयोगाच्या या लेखी परीक्षेत आता पास कोण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, काही महिन्यांपासून आयोगाकडे एकनाथ शिंदे गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवसेना व धनुष्यबाणावर आमचाच ताबा असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या १७ जानेवारीला अपूर्ण राहिलेला युक्तिवाद आज ठाकरे गटाचे कपिल सिब्बल यांनी पूर्ण केला. यानंतर त्याच गटाचे देवदत्त कामत यांनी पुन्हा युक्तिवाद केला. सादिक अलीचा संदर्भ शिवसेनेसाठी लागू होत नसल्याचा दावाही यावेळी करण्यात आला.

ठाकरे गटाचा दावा काय होता?शिवसेना पक्षाची घटना, शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसेनेच्या संदर्भात निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेल्या प्रतिनिधी सभेवर ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याचा दावा या दोन्ही वकिलांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्या या गटाचे आमदार व खासदारसुद्धा याच पक्षाच्या घटनेने मिळालेल्या अधिकारामुळे झालेले आहेत, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले. लोकप्रतिनिधी म्हणजे राजकीय पक्ष होऊ शकत नाही. लोकप्रतिनिधी त्या पक्षाचा भाग असतात, परंतु पक्षात असलेले पदाधिकारी व नेते, उपनेतेसुद्धा पक्षाचा अविभाज्य भाग असतात. या पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर कोणताही राजकीय पक्ष उभा राहत असतो. यावर या गटाचा प्रामुख्याने भर राहिला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची संख्या ठाकरे गटाकडे अधिक असल्याचा दावा केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे