शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गाडीतूनच मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन; हिंगोली पुराचा आढावा घेत दिले 'हे' निर्देश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 13:31 IST

Chief Minister Eknath Shinde : नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये ते भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटी घेत आहेत. दरम्यान, राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे संपूर्ण कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून घेतला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे येथील कुरुंदा गाव संपूर्ण पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी गाडीतूनच स्वतः दिल्लीवरून हिंगोलीचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली. याशिवाय, काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.

हिंगोली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात आज सकाळी आठ वाजेपर्यंत ६६.७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील बाळापूर, डोंगरकडा, वारंगा, आंबा, गिरगाव, कुरुंदा या सहा मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दरम्यान, कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसले असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली तर गाव सकाळी सात वाजेपर्यंत पाण्याखालीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. २०१६ मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते, तेव्हाही करोडो रुपयांची हानी झाली होती. यावेळीही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. 

मिळेल तेथे घेतला आश्रयकुरुंदा गावात रात्री दोन वाजेपासून पुराचे थैमान सुरू होते, जिकडे तिकडे हाहाकार पसरला होता. एक मजली घर असलेल्यांना जीव वाचवायचा कसा? असा प्रश्न पडला होता, घरात पाणी घुसले रस्त्यावर वेगाने पाणी वाहत होते.  त्यामुळे कोणी शेजाऱ्याकडे दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. तर काहींनी उंच भागातील शाळा ग्रामपंचायत इमारत आधी ठिकाणी आश्रय घेतल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेHingoliहिंगोलीfloodपूर