शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, "लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 14:47 IST

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.   

नवी दिल्ली : राज्यात नवे सरकार अस्तित्वात येऊन अनेक दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? तसेच, मंत्रिमंडळात भाजप आणि शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना संधी मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून सुद्धा नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. यावेळी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.   

शनिवारी एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. त्यावेळी शासकीय कामांच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. दिल्ली दौऱ्याचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा काही संबंध नाही. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकील मी उपस्थित राहणार आहे. तसेच, उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. या दोन्ही  बैठकांसाठी मी दिल्लीत आलो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

याचबरोबर, प्रसारमाध्यमांनी एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला. यावेळी, लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अडथळा नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पोहोचले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा अंदाज बांधण्यात येत आहे. दरम्यान, शिंदे-भाजप सरकार स्थापन होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. यावरुन सरकारवर विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसdelhiदिल्लीBJPभाजपा