शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

'मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 10:39 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे

मला मुख्यमंत्रिपदाला चिकटून राहायचं असतं तर बसू शकलो नसतो का? मला कळलं नव्हतं का माझे आमदार फुटत होते? त्यांना पकडून हॉटेलमध्ये टाकू शकलो नसतो का? या मिंद्याचं काय, उचलून त्याची दाढी खेचून कुठूनही आणलं असतं, असं विधान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. कोकण दौऱ्यावर असताना अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता. 

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोकणातील सभेत मला दाढी खेचून आणले असते म्हणाले होते, मात्र गेल्या अडीच वर्षात जे वर्षाची माडी उतरू शकले नाहीत. मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. तसेच शिवसेनेचा धनुष्यबाण हा प्रभू रामचंद्राचा आणि हिंदुत्वाचा धनुष्यबाण असून या धनुष्यबाणाने वेध घेऊन आपल्याला अहंकाराची, मगृरीची आणि गर्वाची मशाल कायमस्वरूपी विझवायची असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.

कोकण दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर येथेच टीका करून मोदी गॅरंटीद्वारे तयार झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये बसून मुंबईला आले हेच पंतप्रधान मोदींचे यश आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन आम्ही वाटचाल करत असून गेल्या दोन वर्षात घेतलेला प्रत्येक निर्णय सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. ज्या शिवसैनिकांनी धनुष्यबाण वाचवण्यासाठी घाम गाळला, रक्त सांडले, अंगावर केसेस घेतल्या त्यांनाच आज गद्दार ठरवण्यात येत असल्याची खंत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली.

रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली अन् काँग्रेसने वाढवली-

रेल्वे भारतीय संपत्ती आहे. भाजपाच्या बापाची नाही. रेल्वे ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसने वाढवली. दोन-चार नवीन ट्रेन तुम्ही सुरू केल्या, त्या मालकीच्या आहेत का, देश तुमच्या मालकीचा आहे का, या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे, तुमची नाही. भाजपावाले मुर्ख आहेत. त्यांना काऊंसिलिंगची गरज आहे, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून हल्लाबोल केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना