शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नारायण राणेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 07:50 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देआता गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. राणेंचा भाजपा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे हे संकेत आहेत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. 

मुंबई, दि. 26 -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो टि्वट करुन ही माहिती दिली तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छांसंदर्भातले एक टि्वटही रिटि्वट केले आहे. राज्याच्या राजकारणात नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी महत्वपूर्ण आहेत. 

नारायणे राणे यांचा 27 ऑगस्टपूर्वी भाजपा प्रवेश होईल अशी शक्यता होती. पण राणेंच्या मार्गात काही अडथळे आल्याने प्रवेश लांबल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. आता गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. राणेंचा भाजपा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे हे संकेत आहेत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. 

याआधी काही महिन्यांपूर्वी राणे यांनी अहमदाबादमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. पण त्यावेळी राणे यांनी लागलीच असे काही घडले नसल्याचा खुलासा केला होता. पण आता राणे यांच्याकडून भाजपाप्रवेशाच्या कुठल्याही बातमीचे खंडन करण्यात आलेले नाही. नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तरच निश्चितच कोकणात भाजपाला फायदा होईल पण मंत्रिमंडळात त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्नच आहे. कारण राणेंचा एकूणच स्वभाव लक्षात घेता ते कमी महत्वाच्या खात्यावर समाधानी होणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले. 

कोकणात देवगड वगळता भाजपाची फारशी ताकद नाही. राणे यांच्या प्रवेशाने भाजपाला तिथे बळ मिळेल. सत्तेचे बळ मिळाले तर, राणेंमध्ये थेट शिवसेनेला अंगावर घेण्याची क्षमता आहे. त्यामुळेच राणेंना पक्षात प्रवेश देण्याचा गांर्भीयाने विचार सुरु आहे. सध्या कोकणात शिवसेनेचे वारे असले तरी, अलीकडच्या काळात राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने इथे ब-यापैकी यश मिळवले आहे. 

राणेंचे सुपूत्र नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना पराभव स्विकारावा लागला. पाठोपाठ विधानसभेत नारायण राणेंचाही कुडाळमधून पराभव झाला होता.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे