शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:28 IST

Devendra Fadnavis on Raj Uddhav Alliance: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार या विषयाभोवती चर्चेचा धुरळा उडत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीही झाल्या. या दोन्ही कुटुंबांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले?

Devendra Fadnavis Maharashtra News: राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. शरद पवार आणि अजित पवार बैठकीच्या निमित्ताने भेटताना दिसले आणि राज्यात पुन्हा चर्चांना उधाण आले. ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या विधानांचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. याच सगळ्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'एनडीटीव्ही मराठी'च्या कार्यक्रमात मुलाखत झाली. यावेळी त्यांना ठाकरे बंधू आणि पवार काका-पुतण्या यांच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

वाचा >>'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर

राज्यात पुन्हा काही राजकीय आघाड्या होताना तुम्हाला दिसत आहेत का? कारण दोन-तीन दिवसांपूर्वी आपण बघितलं की, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. पुण्यात शरद पवार-अजित पवार भेटले. हे राजकीय आघाडी होतंय तुम्हाला दिसत आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. 

'...तर आम्हाला त्याची अडचण नाही'

प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "माझी पहिली भूमिका कुठलेही परिवार एक होत असतील, तर आम्हाला त्याची अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावं. आम्ही त्यांच्या एकत्रित येण्याचं स्वागत करू."

एकत्र येण्याची कुठलीही परिस्थिती दिसत नाही -फडणवीस

"दुसरं, माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात आणि फार जास्त संदर्भ काढतात. दोन वाक्यांमधील अर्थ काढणं, हे जेवढं तुम्ही करता. मला असं वाटतं की, फार पुढचा विचार तो असतो. आतातरी मी स्पष्टपणे सांगतो. काय जे चाललेलं असेल... आतातरी अशा प्रकारच्या रिअलाईमेंटची मला कुठलीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिला, असं तुम्ही म्हणत आहात. ते याबद्दल अधिक सांगू शकतील. मी त्याबद्दल अधिक सांगणं योग्य नाही. त्यामुळे हा मुद्दा तुम्ही त्यांनाच विचारा", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

"तुम्ही एक लक्षात ठेवा, जे तुम्ही करता (अर्थ काढता) ते कधीच होत नाही. एवढा तर तुम्ही अनुभव घ्या २०१९ पासूनचा", असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढला.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार