ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - भाजप-शिवसेनेनं मार्चमध्येच जनतेला एप्रिल फूल केलं आहे. ज्यांना माफिया म्हटलं त्यांच्यासोबतच भाजपाने घरोबा केला आहे. मुंबई महापौर निवडणुकीबाबत जे नाट्य घडलं त्यातून भाजप अणि शिवसेनेचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेची पारदर्शी फसवणूक केली आहे. निवडणूकिपूर्वी राजीनामा देणऱ्या शिवसेना मंत्र्यांचे राजीनामे कुठे गेले? राजीनामा ही तर फक्त नौटंकी होती, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. सोमवार पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, या अधिवेशनात आम्ही अविश्वास ठराव आणणार नाही. मात्र, महाराष्ट्रातील विविध प्रश्नावर आम्ही आक्रमक पण विरोध करणार असल्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषेदेत सांगितले. यावेळी धनंजय मुंडेही उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर केलेल्या आरोपांची आठवण करुन देण्यासाठी आम्ही यंदाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री आणि शिवसेनेला डू यू रिमेंबर असा प्रश्न विचारणार आहोत. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमधील भांडण पाहता हे अधिवेशन सरकारचे शेवटचे अधिवेशन ठरेल की काय असे वाटत होते. पण निकालानंतर खोदा पहाड निकला चुहा अशी अवस्था झाल्याचे मुंडे यांनी सांगितले.