शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला... आता 'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 13:57 IST

राज्यात 2008मध्ये कर्जमाफी योजनेतील लाभापासून वंचित राहिलेल्या अशा 2001 ते 2009 पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारनं राज्यातील शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु त्यातही काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. राज्यात 2008मध्ये कर्जमाफी योजनेतील लाभापासून वंचित राहिलेल्या अशा 2001 ते 2009 पर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकरी खातेदारांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून लाभ देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.2016-17मधील जे थकीत खातेदार आहेत, त्यांचा आढावा घेण्यात येऊन त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य ती योजना तयार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदन दिले आहे. फडणवीस म्हणाले, 'शेतकरी, कष्टकरी व आदिवासींच्या संघटनांनी शासनाला सोमवारी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मागण्यांबाबत मंत्र्यांची एक समिती गठित करण्यात आली.मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील ठळक मुद्दे

  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ 2001 ते 2009 मधील थकित खातेदारांना देण्याचा निर्णय.
  • मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना येथे उपकेंद्र स्थापन करण्यासाठी 396 कोटींचा खर्च आणि आवश्यक पदांस मान्यता.
  • बृहन्मुंबईतील शासकीय जमिनींवरील संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्याच्या नूतनीकरणासंबंधीच्या धोरणात सुधारणा करण्यास मान्यता.
  • भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासित-विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाधिकाराचे सर्वेक्षण करून पुनर्विलोकन करण्याचा निर्णय.
  • कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळावर निवडणुकीसाठी व्यापारी व अडते या घटकातील मतदार होण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियम-1963 मध्ये सुधारणा.
  • राज्य कामगार विमा योजनेसाठी राज्य कामगार विमा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय.
  • यवतमाळ जिल्ह्यातील देवधर (ता. राळेगाव) येथील बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी निवड.
  • वन विभागातील योजना-योजनेत्तर फंडातून वेतन घेणाऱ्या आणि नियमित करण्यास पात्र असणाऱ्या उर्वरित 569 कामगारांना कायम करण्याचा निर्णय.
  • भूमिगत नळमार्ग टाकणे आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्काचे संपादन करण्यासह त्यांच्याशी संबंधित इतर बाबींसाठी तरतूद करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस