मुंबई : महावितरणच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख व मुख्य महाव्यस्थापक राम दोतोंडे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. तत्कालीन विद्युत मंडळ आणि महावितरण कंपनीत त्यांनी ३२ वर्षे सेवा केली. १९८३ साली मंडळात रुजू झालेले दोतोंडे १९९६ पासून जनसंपर्क विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. कंपनीअंतर्गत व्यवस्थापकीय संचालक ते जनमित्रांपर्यंतच्या थेट संवादाचे नवे स्वरूप त्यांनी जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले. सध्या राम दोतोंडे मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या महाव्यवस्थापकपदी रुजू झाले आहेत. (प्रतिनिधी)
महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक राम दोतोंडे सेवानिवृत्त
By admin | Updated: July 1, 2015 00:30 IST