शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक

By admin | Updated: July 28, 2016 19:52 IST

कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २८ : कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. हा सराईत गुन्हेगार छोटा राजनचा जवळचा हस्तक  माट्या भाई याच्यासाठी काम करीत असल्याचे समोर आले असून अनेक बिल्डरांकडून खंडणी उकळण्याची त्यांची कार्यपध्दती असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.

प्रशांत भगवान वनशिव (वय 28, रा. धायरी गाव, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना खब-याने वनशिव याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्र असल्याची माहिती दिली होती. हे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी तो धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सुचनांनुसार तातडीने सापळा लावण्यात आला. वनशिव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, शैलेश जगताप, संतोष पागार, निलेश पाटील, अशोक आटोळे, राहुल घाडगे, विनायक जोरकर, प्रमोद गायकवाड, परवेज जमादार, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली. पुढे येऊन तक्रारी द्याप्रशांत वनशिव हा छोटा राजनचा जवळचा मुंबईस्थित हस्तक ह्यमाट्याभाईह्ण याच्यासाठी काम करतो. धायरी आणि त्या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना छोट्या राजनच्या नावाने धमकावून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलिसांना समजली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांना त्याने धमकावले असेल अगर खंडणी उकळली असेल त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पाटील स्पष्ट केले आहे.वनशिव याने 15 जुलै 2014 रोजी सुरेश बाबुलाल शिंदे (वय 40, रा. आंबेगाव खुर्द) यांचा राजकीय वैमनस्यातून खून केला होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वनशिव याची आई उमेदवार म्हणून उभी होती. तिच्या विरोधात शिंदे यांची पत्नी निवडणूक लढवीत होती. त्या वादामधून शिंदे यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.