शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

मविआचे जोडे मारो आंदोलन; भाजपचे अभिवादनाने प्रत्युत्तर, विरोधकांचा सरकारविरोधात मुंबईत मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 07:00 IST

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील पुतळा  कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले.

 मुंबई : राजकोट किल्ल्यावरील पुतळा  कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह तीनही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे. - शरद पवार, ज्येष्ठ नेते

पंतप्रधानांनी माफी मागितली; पण त्यांच्याचेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. महाराजांचा अपमान करणाऱ्या शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया केले पाहिजे.  - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना 

शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला गेला. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली; पण हे पाप अक्षम्य आहे. चुकीला माफी नाही. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

जगभरातील शिवप्रेमी जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले, त्यांना माफी नाही. जे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. - छत्रपती शाहू महाराज, खासदार

काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवलामुंबई : महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला भाजपने राज्यव्यापी आंदोलन करत प्रत्त्युत्तर दिले. भाजपने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मविआचा निषेध केला. महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे. त्यानंतरही विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला.काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला. त्यांनी देशाला शिकवले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. मात्र, शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याचा लुटलेला खजिना परत मिळवला. जो पुढे स्वराज्यासाठी वापरला. महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले, पण तिथल्या सामान्य माणसांची लूट केली नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

 काँग्रेसला माफी मागायला लावणार का? पं. जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांबद्दल 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिले आहे, त्यावर उद्धव ठाकरे व शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा तिथल्या कमलनाथ सरकारने तोडला. कर्नाटकात शिवरायांचा पुतळा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हटवला, त्यावर ठाकरे किंवा पवार काहीच का बोलत नाहीत? असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMumbaiमुंबईMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा