छगन भुजबळ यांच्या उपचारावरून गदारोळ, उपचारात कमतरता पडू दिली जाणार नाही - गिरीश बापट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:20 AM2018-03-07T06:20:27+5:302018-03-07T06:20:27+5:30

बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यावरून सलग दुस-या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी झाली. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.

 Chhagan Bhujbal's treatment will not be given due to lack of treatment, Girish Bapat | छगन भुजबळ यांच्या उपचारावरून गदारोळ, उपचारात कमतरता पडू दिली जाणार नाही - गिरीश बापट

छगन भुजबळ यांच्या उपचारावरून गदारोळ, उपचारात कमतरता पडू दिली जाणार नाही - गिरीश बापट

Next

मुंबई - बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना खासगी रुग्णालयात उपचार देण्यावरून सलग दुस-या दिवशी विधान परिषदेत खडाजंगी झाली. अखेर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी भुजबळ यांच्या औषधोपचारात कसलीच कमतरता पडू दिली जाणार नाही, असे सांगत या विषयावर पडदा टाकला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी भुजबळांच्या उपचारावरुन सभागृहात झालेल्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. एका आरोपीच्या उपचाराबाबत चर्चा करताना जे.जे. रूग्णालयापेक्षा खासगी रूग्णालये चांगली आहेत, असे सांगून सरकारी रुग्णायालयांचा अवमान करण्यात आला. सरकारी रूग्णालयांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला. याबाबत आरोग्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी रावतेंनी केली. यावर, सरकारी रूग्णालयावर अथवा जेजेवर अविश्वास व्यक्त करण्यात आला नाही. भुजबळ यांना तपासणीसाठी रांगेत थांबावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता, असे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. मात्र, रावते यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे सदस्य आक्रमक झाले. या गदारोळामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याची घोषणा केली.
खासगी रुग्णालयातील उपचाराची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा लावून धरली. तर, सरकारला सभागृहाचे कामकाज चालवायचे नाही. गोंधळ घालत कामकाज रेटण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप सुनिल तटकरे यांनी केला. भुजबळ आरोपी असले तरी त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. कसाब, तेलगीसारख्या लोकांना चांगले उपचार मिळतात मग भुजबळांना का नाही, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना, भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार देण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या तब्बेतीची योग्य काळजी घेण्यात येत आहे, असे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी सभागृहात सांगितले.

भुजबळांवर योग्य उपचार
होतील : मुख्यमंत्री

सरकारकडून तुरुंगात असलेल्या व्यक्तीच्या बाबत कोणताही हस्तक्षेप केला जात नाही. मात्र छगन भुजबळ हे राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले असल्याने त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार व्हावेत यासाठी तुरुंग प्रशासनाला योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी या बाबत औचित्याच्या मुद्याद्वारे हा विषय उपस्थित केला होता.
 

Web Title:  Chhagan Bhujbal's treatment will not be given due to lack of treatment, Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.