शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत जे घडलं ते राष्ट्रवादीत घडलं नाही; आमची बाजू भक्कम, छगन भुजबळ म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 16:42 IST

राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे असं भुजबळांनी म्हटलं.

मुंबई - शिवसेनेत व्हिप बदलले, कुणी व्हिप काढले, कुणी आदेश दिले अशा असंख्य गोष्टीची चर्चा शिवसेनेच्या निकालावेळी झाली. आमच्याबाबतीत ही परिस्थिती नाही. आमचा व्हिप बदललेला नाही. आधी जो होता तोच आहे असं त्यामुळे आमच्या प्रकरणात आणि ठाकरेंच्या प्रकरणात फार मोठा फरक आहे असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 

छगन भुजबळ यांनी म्हटलं की, विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला. त्यामुळे कुठलाही गट असता तरी ज्याच्याविरोधात हा निकाल लागला तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाणारच. कालच्या निकालात व्हिप कोण, व्हिपचा आदेश बरोबर आहे का? व्हिपची नेमणूक बरोबर आहे का? या असंख्य गोष्टी फिरत होत्या. मात्र आमच्या बाबतीत तसे नाही. आमचा व्हिप बदलेलाच नाही. जो व्हिप आधी होता तोच आताही आहे. त्यामुळे आमची बाजू भक्कम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आणि वकील आहेत. या प्रकरणात अनेक कायदे तज्ज्ञांनी त्यांना मदत केली असणार आहे. दीड तास निकालाचे वाचन सुरू होते असं भुजबळांनी सांगितले. दरम्यान, अजून दोन्ही बाजूची सुनावणी होणार आहे. आमची जी मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांसमोर मांडू. त्यामुळे धाकधूक वाटण्याचा प्रश्न नाही. विधानसभा अध्यक्षांनी जर पुरावे पाहिले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

लोकशाहीचा विजय आणि घराणेशाहीचा पराभव

लोकशाहीत निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी कॉंग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचार केवळ एका खुर्चीसाठी सोडले त्यांना हा निकाल एक ही मोठी चपराक असल्याचं सांगत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे.  सर्वोच्य न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम या मंडळींनी केले. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही, एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मनमानी कारभार करुन स्वत:च्या स्वार्थासाठी घटनाच पायदळी तुडविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस