शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 06:52 IST

खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली.

मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी हजेरी न लावल्याने मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दीड तास वाट पाहूनही भुजबळ हजर न राहिल्याने अखेरीस न्यायालयाने वॉरंट बजावण्याची तंबी दिली आणि धावतपळतच भुजबळ न्यायालयात हजर राहिले.

खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली. खटल्याचे कामकाज सुरू होऊन दीड तास उलटले तरी भुजबळ न्यायालयात गैरहजर होते. न्या. राहुल रोकडे यांनी दोन-तीन वेळा भुजबळांच्या उपस्थितीबाबत त्यांच्या वकिलांकडे विचारणा केली. दरवेळी त्यांचे वकील ते येत असल्याचे सांगून न्यायालयाची माफी मागत होते. अखेरीस संतापलेल्या न्या. रोकडे यांनी भुजबळ यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची तंबी दिली. वॉरंटची तंबी मिळताच वकिलांनी न्यायालयाबाहेर पडत फोन केला आणि भुजबळ १५ मिनिटांतच न्यायालयात हजर राहिले.

अन्य आरोपींना कोर्टात ठेवले बसवूनभुजबळ न्यायालयात पोहोचत नाहीत, तोपर्यंत अन्य आरोपींना न्यायालयातून न हलण्याची सूचना न्यायालयाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्यासंदर्भात केलेल्या घोषणेबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू होती. या बैठकीस भुजबळ हजर होते. न्यायालयाने वॉरंट जारी करण्याची तंबी देताच भुजबळ तेथून थेट न्यायालयात पोहोचले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळCourtन्यायालयSharad Pawarशरद पवार