शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

चेकमेट लूट : कच-याच्या डब्यातही रोकड भरुन नेली

By admin | Updated: June 28, 2016 19:12 IST

चेकमेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतील नऊ कोटींची रोकड लुटणा-यांनी केवळ पाचशे आणि एक हजारांच्या नोटांचे बंडल चोरले. ही रोकड भरण्यासाठी त्यांनी अगदी

- जितेंद्र कालेकर

ठाणे : चेकमेट सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतील नऊ कोटींची रोकड लुटणा-यांनी केवळ पाचशे आणि एक हजारांच्या नोटांचे बंडल चोरले. ही रोकड भरण्यासाठी त्यांनी अगदी कच:याचा डब्यांचाही वापर केला. अशा तीन वेगवेगळया बॅरमधून त्यांनी करोडो रुपयांची रोकड नेली. 11 कोटींची रोकड असलेल्या पत्र्याच्या बॅगा त्यांनी उघडल्या असल्या तरी 100, 50 आणि दहाच्या नोटांच्या बंडलांना त्यांनी हातही लावला नाही. अत्यंत सुत्रबद्धपणो केलेल्या या जबरी चोरीने ठाणो पोलिसांना मोठे आव्हान दिले आहे.या लुटारुंनी सेंटरमध्ये शिरकाव केल्यानंतर त्यांच्या अपेक्षेपेक्षा मोठया प्रमाणात रोकड त्याठिकाणी त्यांना मिळाली. त्यामुळे शंभर आणि पन्नासच्या नोटांऐवजी केवळ हजार आणि पाचशेच्या नोटांची बंडलांचा त्यांनी ताबा घेतला. नोटा कशामध्ये भरायच्या हा प्रश्न निर्माण झाल्यावर तिथेच असलेल्या कचरा भरण्याच्या तीन प्लास्टीकच्या बॅरलमध्ये त्यांनी ही बंडले भरली. नेतांनाही त्यांनी तशाच प्रकारे नेली. उर्वरित शंभर, पन्नास आणि दहाच्या नोटा भरण्यासाठी साधनच नसल्यामुळे त्यांनी त्या नोटा तशाच ठेवल्या त्यामुळेच 11 कोटींपैकी सुमारे दीड ते दोन कोटींची रोकड कापडी सिलबंद पिशव्यांमध्ये तशीच राहिली. अशा सुमारे 400 ते 500 थैल्यांमध्ये कॅश होती, अशी माहिती कंपनीने दिली. त्याचवेळी स्ट्राँगरुमध्ये असलेली 26 पैकी 15 कोटींची रोकड स्ट्राँगरुममध्ये राहिल्यामुळे सुरक्षित राहिली, तिथे रोकड असल्याची कल्पना न आल्यामुळेच ती रोकड वाचल्याचे सूत्रंनी सांगितले. तर कंपनीत 23 कोटींची रोकड होती. त्यातील नऊ कोटी 16 लाख रुपये लुटल्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंग पाटणकर यांनी सांगितले. त्यामुळे 14 कोटींची रोकड वाचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.असे होते कलेक्शनठाणो आणि मुंबई परिसरातील सुमारे एका हजार हून अधिक मोठे व्यापारी, मॉल्स, मेडीकल्स आणि सराफांच्या दुकानांमधील दररोज पाच लाख ते दोन कोटींची रोकड दररोज जमा करणा-या चेकमेटमध्ये सुमारे 90 कामगार आहेत. बांद्रा येथे या कंपनीचे मुख्यालय असून ही रोकड गोळा करण्यासाठी कंपनीला बँकांकडून काही ठराविक मोबदला मिळतो. बँकेच्या कोणत्याही ग्राहकाकडून इन कॅमेरा संबंधित ग्राहकाच्या समोर सेंटरमध्ये पडताळणी केली जाते. त्यात बनावट आणि फाटलेल्या नोटांचा परतावा केला जातो. कलेक्शन सेंटरला असा होतो फायदा..मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच त्यांच्या बँकेत पैसे भरणा करण्याचा वेळ वाचावा आणि पैसे हाताळण्याची रिस्क नको म्हणून बँकेकडून थेट ग्राहकांच्या दारार्पयत ही सेवा पुरविली जाते. त्यात चेकमेटने पनवेल ते मुंबईपर्यत सहा वेगवेगळया बँकांच्या ग्राहकांसाठीचे जाळे पसरविले आहे. एखाद्या ग्राहकाकडून पाच ते दहा लाख रुपये गोळा केल्यावर बँकेकडून त्यांना दोन हजार रुपये दिले जातात. 10 लाखाहून अधिक रकमेसाठी पुढे 500 रुपयांनी त्यात वाढ होते. या कामासाठी चांगली यंत्रणाही राबविली असली तरी सुरक्षिततेसाठी कंपनीने विशेष खबरदारी न घेतल्यानेच हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोणत्या ग्राहकाची किती रोकडअभ्युदय बँकेच्या एका ग्राहकाची तीन कोटी, हरिहंत बँक - दीड कोटी, समता को ऑप बँक 50 ते 60 लाख अशा किमान हजार ग्राहकांच्या रोकडचा यात समावेश होता.तपासासाठी दहा पथकेठाणो पोलीसांच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठया रकमेची जबरी चोरी नोंद झाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभागाची पाच पथके आणि पाच वेगवेगळया परिमंडळातील पाच स्वतंत्र पथके अशी दहा पथके केवळ या एकाच तपासासाठी नियुक्त केल्याचे वागळे विभागाचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले. या सेंटरमधून सात कर्मचा:यांचे मोबाईलही लंपास करण्यात आले असून त्याचेही लोकेशन स्ट्रेस करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. पहाटे ही घटना घडल्यानंतर सकाळी 9 वा. च्या दरम्यान मुंबईतील काळबादेवी आणि ठाण्यातील खारकर आळी अशी वेगवेगळया ठिकाणी या टोळीतील काही जण असल्याचा सुगावा लागला होता. मात्र, त्यात ठोस काहीच माहिती नंतर हाती आली नसल्याचे सूत्रंनी सांगितले.