शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

नोटमोजणी मशीनची दर तीन महिन्यांनी तपासणी करा, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 14:13 IST

नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले.

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत २०१६ नंतर आलेल्या सर्व चलनातील नोटांचा दर्जा उत्तम राहील याची दक्षता घेण्यासाठी बँकांतील नोटा मोजणी मशीनमध्ये काहीसे बदल झाले आहेत. त्यामुळे या मशीनची अचूकता आणि कार्यक्षमता यांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्याचे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत.नोटबंदीनंतर भारतीय चलनात नव्या नोटा जारी करण्यात आल्या. आधीच्या नोटांच्या तुलनेत या नव्या नोटांच्या दर्जामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या. तसेच नव्या नोटांकरिता नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही काही बदल करण्यात आले. प्रामुख्याने नोटांची सत्यता पडताळतानाच त्या व्यवहारासाठी योग्य आहेत की नाही याची चाचपणी या मशीनमध्ये होते. मात्र, या नव्या नोटांमध्येदेखील बनावट नोटांचे प्रमाण वाढत आहे. तसेच खराब होण्याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मशीनची योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि बँकेतून जाणारी किंवा येणारी प्रत्येक नोट काळजीपूर्वक तपासावी, असे निर्देश शिखर बँकेने दिले आहेत. दरम्यान, नव्या नोटा जेव्हा बाजारात आल्या तेव्हाच त्यावर कोणत्याही प्रकारे पेन अथवा पेन्सीलने केलेल्या खुणा नकोत अथवा काही लिहिलेले नको, असे असल्यास त्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत हे रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक