शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

नोकरीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक

By admin | Updated: May 16, 2016 03:09 IST

नोकरी तर नाहीच, उलट घेतलेले पैसे व पासपोर्ट न देता तरुणांनाच जेलमध्ये टाकण्यासाठी धमकावले जात आहे.

मीरा रोड : परदेशात नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नोकरी तर नाहीच, उलट घेतलेले पैसे व पासपोर्ट न देता तरुणांनाच जेलमध्ये टाकण्यासाठी धमकावले जात आहे. सध्या तरी महाराष्ट्र व झारखंडमधील तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मीरा रोड येथील नयानगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्र ार अर्ज दिला आहे.पूनम सागर कॉम्प्लेक्समध्ये इश्तिहाक सर्जी याचे ‘ओव्हरसिस फ्युचर कन्सल्टन्सी’ हे कार्यालय आहे. अरु णाचल व आसाम येथे ‘फ्युचर करिअर’ ही मुख्य एजन्सी आहे. सर्जी याने वृत्तपत्रात जाहिरात देऊन परदेशात नोकरीची हमी दिली होती. त्याआधारे मेकॅनिकल डिप्लोमा केलेले नागपूरचे संदीप धाबरडे व झारखंडचे तापेश्वर महतो सर्जीच्या संपर्कात आले. त्यांनी त्यांना दुबईत नोकरीचे आश्वासन दिले होते. महतो यांच्याकडून क्वॉलिटी कंट्रोलरच्या नोकरीसाठी एक लाख आठ हजार रु पये तर संदीप यांच्याकडून ९७ हजार रु पये घेण्यात आले. त्यासाठी त्यांनी पुण्यातील हातची नोकरीही सोडली होती. नालासोपारा येथील आठवी शिकलेल्या रमेश पवार याला सिंगापूर येथे हेल्परची नोकरी दिली जाणार होती. त्यासाठी त्याच्याकडून ८० हजार रुपये उकळण्यात आले.महतो आणि संदीप यांना चक्क मजूर म्हणून दोन महिन्यांचा व्हिसा असल्याचा कागद व विमानाची बोगस तिकिटे देण्यात आली. परंतु, नंतर त्यांना सौदी अरेबियात ट्रेनिंग होणार आहे, पण लेबर व्हिसा मिळाला, असे सांगण्यात आले. मात्र, इंजिनीअरिंगच्या नोकरीसाठी पैसे भरणाऱ्या तापेश्वर व संदीप यांनी आक्षेप घेताच केवळ वेळकाढू उत्तरे देण्यात आली. तर, रमेशलाही सौदीला सुपरवायझरची नोकरी देतो, असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नोकरी मिळालीच नाही. तसेच पैसेही देण्यात टाळाटाळ करण्यात आली. या तरु णांना आसाम येथे बोलवून अनेक महिने थांबवण्यात आले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पैसे व पासपोर्ट मागितला असता त्यांच्याकडून वर कॅन्सलेशन फी मागण्यात आली. एजन्सीने या तरु णांचे पासपोर्टही बळजबरी स्वत:च्या ताब्यात ठेवले आहेत. उलट, पोलिसात तक्र ार करून अटक करायला लावू, अशी धमकी या तरु णांना आसाम येथे देण्यात आली. कसेबसे येथून निघालेल्या या तरु णांनी आता नयानगर पोलीस ठाण्यात तक्र ार अर्ज दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.के. जाधव यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)