शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

खासगी कंपनीकडून एसटी महामंडळाची फसवणूक; आसनांवरील स्क्रीनसह इंटरनेट यंत्रणेतही बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 03:53 IST

वातानुकूलित शिवशाहीवरील स्थानक नामफलक मराठीत डिजिटल स्वरूपात असावेत, असा करार एसटी महामंडळाने खासगी कंपनीसोबत केला होता. मात्र या कराराची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही.

मुंबई : वातानुकूलित शिवशाहीवरील स्थानक नामफलक मराठीत डिजिटल स्वरूपात असावेत, असा करार एसटी महामंडळाने खासगी कंपनीसोबत केला होता. मात्र या कराराची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर शिवशाहीमधील आसनांमागे असलेल्या स्क्रीन आणि बसेसमधील इंटरनेट सुविधेतही बिघाड असल्यामुळे शिवशाहीच्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महामंडळाच्या ताफ्यात एकूण दोन हजार वातानुकूलित शिवशाही दाखल होणार असून मार्च २०१९ पर्यंत त्या राज्याच्या विविध मार्गांवर धावणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार १६० वातानुकूलित (बैठ्या) शिवशाही एप्रिल २०१८ पर्यंत दाखल होणार आहेत. यापैकी ६६४ शिवशाही राज्यभर धावत आहेत. मात्र यापैकी काही शिवशाही बसमध्ये मराठी डिजिटल नामफलक नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर शिवशाहीमधील इंटरनेट सुविधा आणि आसनांमागील स्क्रीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. त्यामुळे खासगी कंपनीने महामंडळाची फसवणूक केल्याचे पाहायला मिळत आहेत. ऐन सुट्टीत प्रवासी गारेगार व मनोरंजनपर प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी शिवशाहीला पसंती देत आहेत. मात्र शिवशाहीमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी शिवशाही सुरू आहे. शिवशाही ही माझी संकल्पना असून ती यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. येथील मराठी डिजिटल नामफलक मी स्वत: पाहिले आहेत. स्क्रीन आणि इंटरनेटमध्ये तांत्रिक बिघाड उद्भवू शकतो. अद्याप सर्व बस ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. महामंडळातील वातानुकूलित शिवशाहीच्या देखभाल-दुरुस्ती आणि फेऱ्यांच्या नियोजनासाठी स्वतंत्र महाव्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे.- दिवाकर रावते, परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ