शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Voice Call द्वारे शिंदे गटाकडून शिवसैनिकांची फसवणूक; ठाकरेंचा आरोप, काय आहे प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2022 11:01 IST

१ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेच्या २ गटात चढाओढ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेना नाव आणि चिन्हासाठी शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करण्यात आला. त्यात निवडणूक आयोगाने अंधेरी पोटनिवडणूक लक्षात घेता दोन्ही गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास बंदी केली होती. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट बहुमत आमच्याकडेच आहे असा दावा करत आहे. 

त्यातच उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने म्हटलंय की, राज्यात बेकायदेशीर सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्वयंचलित मोबाईल यंत्रणेद्वारे ९११७२५२४८२७५ या नंबवरून व्हाईस कॉल करून शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. हा कॉल आल्यानंतर एक दाबा असे ते सूचना करत आहेत. १ आकडा दाबल्यानंतर प्रणालीद्वारे तुम्ही शिंदे गटाला समर्थन केले असा त्याचा अर्थ होतो असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 

तसेच अशाच पद्धतीची यंत्रणा भाजपाच्या आयटी विभागाने करून जगात एक नंबरचा पक्ष म्हणून उच्चांक गाठला होता. राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी सोशल मीडियावरील शिवसैनिक, सर्व अंगीकृत संघटना यांना सूचना आहे की, वरील मेसेज पूर्णपणे वाचून आपापल्या विभागातील सर्वांपर्यंत पोहोचवावा. या व्हाईस कॉलला प्रतिसाद देऊन त्यांच्या सिस्टमला जॉईन होऊ नये असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आले आहे. 

खरी शिवसेना कुणाची यावरून वाद?खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचे यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावावर दावा करण्यात आल्याने निवडणूक आयोगाकडून चिन्हासह शिवसेना नाव तात्पुरते गोठवण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे आता पुढील आदेश येईपर्यंत दोन्ही गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. त्यात प्रत्येक गट त्यांच्याकडे बहुमत असल्याचं सिद्ध करण्यासाठी प्रतिज्ञापत्रे तसेच अन्य मार्गाचा अवलंब करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना