मुंबई : वा रे फडणवीस तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल अशा घोषणा विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनच्या पाय-यांवर ठाण मांडले.दुष्काळ, मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांनी घोषणाबाजीद्वारे लक्ष वेधले. कामकाज सुरू होण्याआधीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ नेते अजित पवार आदींनी विधान भवनाच्या पाय-यांवर ठिय्या दिला होता.ये अंदर की बात हैभाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आगमन झाले, तेव्हा आमदारांनी ये अंदर की बात है, खडसे हमारे साथ है, अशा घोषणा दिल्या. गोटे यांच्यावेळीही तशाच घोषणा दिल्या.
वाह रे फडणवीस तेरा खेल; सस्ती दारू, महंगा तेल! विरोधक आक्रमक; पायऱ्यांवर बसून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 04:55 IST