शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

चौधरी हत्येप्रकरणी मुख्य आरोपी अटकेत

By admin | Updated: May 12, 2017 03:15 IST

घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीत कंत्राटदार किशोर चौधरी यांना गोळ्या घालून ठार मारणारे प्रमुख आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : घरदुरुस्तीच्या वादातून ठाकुर्लीत कंत्राटदार किशोर चौधरी यांना गोळ्या घालून ठार मारणारे प्रमुख आरोपी दिलीप भोईर, शंकर भोईर, सुरज भोईर आणि चिराग ऊर्फ सागर भोईर या चौकडीला विशेष पथकाने गुरुवारी दुपारी कोळेगावातून अटक केल्याची माहिती कल्याण परिमंडळ-३चे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, याप्रकरणी अधिक माहिती शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, याच प्रकणात कुणाल आंधळे (२६) आणि परेश आंधळे (२३, दोघेही रा. ठाकुर्ली) यांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने नाशिक येथील मालेगावातून गुरुवारी पहाटे सापळा रचून बेड्या ठोकल्या. बालाजीनगरमधील देवी शिवामृत सोसायटीत घर दुरूस्तीचे काम मंगळवारी सुरू होते. त्यावेळी आमच्या भागात येऊन काम का करतो, असा सवाल आरोपी दिलीप व शंकर भोईर आणि इतर साथीदारांनी किशोर किसन चौधरी (४२) यांना केला. या वेळी चौधरी यांच्यासोबत नितीन कृष्णा जोशी (३५), महिमादास विल्सन हे तेथे होते. चौधरी आणि भोईर यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी संतप्त झालेल्या भोईरनी किशोर यांच्या डोक्यात व पोटात १२ गोळ्या घातल्या. त्यात ते जागीच ठार झाले. नितीन जोशी यांना एक गोळी लागली असून त्यांच्यावर रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यातील भोईर कुटुंबातील चौघे, परेश-कुणाल आंधळे हे दोघे भाऊ आणि आणखी अनोळखी चार आरोपी फरारी होते. रामनगर पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने शोधांसाठी पथके पाठवली होती. कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहायक पोलीस निरीक्षक विजय खेडेकर, दत्ता भोसले, नरेश जोगमार्गे यांनी खबऱ्यामार्फत माहिती मिळवून कुणाल व परेश यांना मालेगाव येथून अटक केली. विल्सनचा अद्याप शोध नाहीच-किशोर चौधरी यांच्या कार्यालयात मंगळवारी घटना घडली, त्यावेळी हजर असलेला महिमादास विल्सन (१९) हा देखील त्या गोळीबारात जखमी झाला. या घटनेनंतर तोही बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची आई अ‍ॅन्थोनी अम्मा यांनी दिली होती. मात्र, चौधरी हत्येप्रकरणी सहा जणांना अटक केली असली तरी गुरुवारी विल्सनचा शोध लागलेला नव्हता.