शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

छमछम... झगमगाट... अंधार आणि बंदी

By admin | Updated: October 15, 2015 15:32 IST

डान्सबार बंदीचे सर्वत्र समर्थन होत असले तरी ७५ हजार बारबालांना बेरोजगार ठरवणा-या या निर्णयाचा घेतलेला आढावा.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - सुप्रीम कोर्टाने  गुरुवारी पुन्हा एकदा डान्सबारवरील बंदीला स्थगिती देत राज्य सरकारला दणका दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा धाडसी पाऊल उचलला होता. मात्र या निर्णयामुळे तब्बल ७५ हजार बारबाला बेरोजगार झाल्याचा दावा केला गेला. डान्सबार बंदीचा घटना आणि या निर्णयाचे दोन्ही बाजूंवर टाकलेला एक दृष्टीक्षेप.....
 
ऑगस्ट २००५ - तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला. शेतकरी कामगार पक्षाच्या तीन आमदारांनी पाटील यांच्याकडे डान्सबारविरोधात तक्रार केली होती. डान्सबारमुळे तरुण पिढी विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढी उध्वस्त होत असून गुन्हेगारी व कायदाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे या आमदारांचे म्हणणे होते. बार मालकांच्या दबावापुढे नमते न घेता आबांनी डान्सबार बंदीचा फतवा काढला. मुंबई पोलिस कायद्यात सुधारणा करुन हा बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.  यामुळे राज्यातील १४०० डान्स बार एका फटक्यात बंद झाले.
 
१२ एप्रिल २००६ -  राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात बार मालक आणि बारबालांसाठी काम करणा-या संघटनांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने या प्रकरणात बारमालकांच्या बाजूने निकाल दिला. राज्य सरकारचा हा निर्णय  असंवैधानिक असल्याचे सांगत हायकोर्टाने ही बंदी चुकीची ठरवली. 
 
१२ मे २००६ - राज्य सरकारने हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करुन घेत पुढील सुनावणीपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली. 
 
१६ जुलै २०१३ - तब्बल सात वर्ष डान्सबार बंदीचा प्रश्न सुप्रीम कोर्टात प्रलंबित होता. अखेर १६ जुलैरोजी सुप्रीम कोर्टाचे न्या. अल्तमास कबीर आणि न्या. एस एस निज्जर यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर निकाल दिला. खंडपीठाने हायकोर्टाच्या निर्णयाला योग्य ठरवत डान्सबारवरील बंदी मागे घेतली व डान्सबारविरोधात लढाईत राज्य सरकारचा पुन्हा एकदा पराभव झाला. 
 
१३ जून २०१४ - सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतरही गृहमंत्री आर आर पाटील यांनी पुन्हा एकदा डान्सबार बंदीसंदर्भात सुधारित विधेयक आणले. जून २०१४ मध्ये विधीमंडळाने हे विधेयक एकमताने मंजूरही केले. जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न या सुधारित विधेयकात झाला होता. थ्री स्टार आणि पंचतारांकित हॉटेल्सचाही या कायद्यात समावेश करण्यात आला होता. 
 
सप्टेंबर २०१४ - राज्यातील बारमालक संघटनांनी राज्य सरकारच्या सुधारित कायद्याला पुन्हा सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. यानंतर सुप्रीम कोर्टाने दोन वेळा राज्य सरकारला नोटीस बजावत त्यांची भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. 
 
१५ ऑक्टोबर २०१५ - सुप्रीम कोर्टाने डान्सबारवरील बंदीला स्थगिती दिली. २०१४ मधील राज्य सरकारचे सुधारित विधेयक हे जुन्या कायद्यासारखेच असल्याचे मत सुप्रीम कोर्टाने नोंदवले. 
 
आबा ठरले हिरो 
सरकारचे हजारो कोटींचे उत्पन्न बुडाले तरी चालेल, पण कोवळ्या तरुणांना व्यसनाधीन होऊ देणार नाही अशी भूमिका घेत आर आर पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला होता. राजकिय कारकिर्दीत आबांनी घेतलेला हा सर्वात मोठा व धाडसी निर्णय होता. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक झाले व आबांच्या लोकप्रियतेत भर पडली. 
 
झगमगाटातून अंधाराकडे.... बारबालांचा प्रवास 
डान्सबार बंदीचे त्यावेळी कौतुक झाले असले तरी या एका निर्णयामुळे सुमारे ७० हजार बारबाला बेरोजगार झाल्या. अशिक्षित असल्याने या बारबालांना रोजगाराचे साधन मिळत नव्हते.  काही बारबालांना मुलांचे शिक्षणही थांबवावे लागले. रोजगार हिरावल्याने काही बारबालांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले तर काहींनी दुस-या राज्यात स्थलांतर केले. दुबई व अन्य देशांमध्ये बारबालांची पावले वळली.  सुमारे ४० टक्के बारबालांना वेश्याव्यवसायात जावे लागले असा दावा बारमालक संघटनेचे पदाधिकारी करतात.
 
वर्षाला ३ हजार कोटींचे नुकसान
डान्सबारमुळे बारमध्ये मद्यपानासाठी येणा-यांची संख्या चांगलीच वाढली होती. डान्सबारमुळे राज्य सरकारला वर्षाकाठी ३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असते असे या पदाधिका-यांचे म्हणणे आहे. याशिवाय बंदीमुळे मालकांनी डान्सबारची जागा विकावी लागली. तर काही जणांनी डान्सबारचे रुपांतर फॅमिली रेस्टॉरंटमध्ये केले होते. मात्र रेस्टॉरंटमधील स्पर्धेमुळे त्यांचे उत्पन्न घटत गेले व काही जणांनी शेवटी रेस्टॉरंटही बंद करावे लागले होते.