शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 05:45 IST

भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे.

- यदु जोशीभाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे. मोदींबद्दल विरोधक गरळ ओकत असले तरी सामान्य माणसांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची आणि विश्वासाची भावना होती ती मतदानात उतरली. मोदी विरोधकांचा पालापाचोळा झाला. मोदी द्वेषावर आधारित विरोधकांचा प्रचार अंगलट आला.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेवटची सहा महिने पद्धतशीर मोर्चेबांधणी केली. विरोधक त्या बाबत पार गाफील राहिले. काँग्रेस-राष्ट्रवादीचे बलस्थान असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याला लागून असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांनी भाजपत आणले. राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील या व्यक्ती म्हणून नव्हे तर संस्था म्हणून वावरणाऱ्या नेत्यांना त्यांनी भाजपसोबत आणले. साताराा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढात उमेदवारी देऊन जोखीम पत्करली. तशीच जोखीम त्यांनी नांदेडमध्ये पत्करली. आ. प्रताप पाटील चिखलीकर हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचे घोर विरोधक. त्यांना मैदानात उतरवून मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांच्या पराभवाचा पाया रचला.शिवसेनेशी युती होईलच असा विश्वास मुख्यमंत्री बाळगून होते आणि ते युतीचे शिल्पकार ठरले. प्रसंगी भाजपकडे २५ जागा घेत शिवसेनेला २३ जागा देत एक पाऊल मागे घेण्याचे राजकीय शहाणपण त्यांनी दाखविले. युतीमुळे मोठ्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. फडणवीस पक्षहिताशी कधीही तडजोड करत नाहीत.ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला राज्यात देदीप्यमान विजय मिळवून देणरा नेता म्हणून फडणवीस यांची नोंद झाली आहे. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवेंनी पक्षसंघटना बांधली.भाजपच्या राज्यातील विजयात रा.स्व.संघ परिवाराचा मोठा सहभाग आहेच. मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत म्हणून संघच भाजपला हरवेल वगैरे कंड्या अपरिपक्व आणि संघ अजिबात न कळणाऱ्यांकडून पिकविल्या जात होत्या. अशांना संघ कळायला वेळच लागेल; अर्थात तो समजून घ्यायचा असेल तरच.>शिवसेनेला दिली ताकददुष्काळ हाताळण्याबाबत विरोधकांची टीकाही मतदारांनी अनाठायी ठरविली. त्या भागात युतीने दमदार यश मिळविले. कर्जमाफी फसवी असल्याची विरोधकांचा आरोपही साफ फेटाळून लावला.प. महाराष्ट्र चंद्रकांत पाटील, उ.महाराष्ट्र गिरीश महाजन, विदर्भ सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मराठवाडा पंकजा मुंडे, संभाजीा निलंगेकर असे मंत्र्यांना भाग वाटून देत मुख्यमंत्रंनी अचृक ु नियोजन केले. शिवसेना उमेदवारांना सगळे बळ मिळेल याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली.शिवसेनेच्या मतदारसंघातही त्यांनी भाजपच्या नेते, कार्यकर्त्यांना कामाला लावले आणि दरदिवशी तेथील आढावा ते घेत होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019