शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मौलानासह तिघांवर आरोपपत्र

By admin | Updated: January 21, 2016 04:02 IST

भारताबाहेरील दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक कट्टरवाद पसरविण्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले

डिप्पी वांकाणी,  मुंबईभारताबाहेरील दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी धार्मिक कट्टरवाद पसरविण्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुसद येथील मौलानासह तीन तरुणांवर आरोपपत्र दाखल केले. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा व दंडसंहितेखालील विविध गुन्ह्यांखालील हे आरोपपत्र आहे.सुरुवातीस हल्ल्याची साधी व एकाकी घटना मानून स्थानिक पोलिसांनी याचा तपास केला होता. मात्र वरकरणी साधी वाटणारी ही घटना धार्मिक कट्टरवादाने स्थानिक तरुणांची माथी भडकवण्याच्या पद्धतशीर योजनेतून घडली होती, हे एटीएसने केलेल्या तपासातून उघड झाले. या संपूर्ण घटनाक्रमाचे संगतवार वृत्तांकन सर्वप्रथम लोकमतने केले होते.अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक (२०, रा. पुसद, जिल्हा यवतमाळ) याने २५ सप्टेंबर २०१५ रोजी तीन पोलीस शिपायांवर हल्ला केला होता. मलिकवर तेव्हा भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. परंतु याच हल्ल्याच्या एटीएसने केलेल्या समांतर चौकशीत मलिकने गोहत्या बंदीनंतर हा हल्ला केल्याचे समोर आले. अब्दुल मलिकला दहशतवादी कारवायांसाठी मौलाना सलीम मलिक उर्फ रहमान उर्फ मेहबूब शेख (२६) याने मूलतत्त्ववादी बनविल्याचेही स्पष्ट झाले.भारतीय मुस्लिमांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल सलीम मला सांगायचा. आणि मी (मौलाना सलीम) जर तुला ‘कुठेतरी’ पाठविले तर तुझे पालक तू बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे करणार नाहीत अशी खात्री त्याला माझ्याकडून हवी होती, असेही अब्दुल मलिकने त्यात सांगितले होते.याशिवाय मलिक हिंगोलीचा शोएब खान उर्फ अहमद उर्फ रेहमान खान (२५) याच्या संपर्कात होता, असेही आढळले. या शोएब खानला हैदराबाद पोलिसांनी गेल्या वर्षी तो दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली होती. मलिक आणि सलीम यांच्याशी संबंध असल्याचे आढळल्यानंतर शोएब खानला एटीएसने त्यांच्या प्रकरणात अटक केली.आम्ही सोमवारी ७६२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यासोबत आम्ही १२३ साक्षीदारांचे जबाबही जोडले आहेत. शोएब खान हा त्याला परदेशात राहून हाताळणाऱ्यांच्या (हँडलर्स) संपर्कात होता असे आम्हाला आढळले. त्याने आधी मी एकटाच प्रवास करीन व तेथे सगळी व्यवस्था केल्यानंतर माझ्यासोबतीसाठी दोघांना बोलावून घेईन, असेही त्याने आम्हाला सांगितल्याचे वरिष्ठ एटीएसच्या अधिकाऱ्याने सांगितले. या आरोपपत्रासोबत दहशतवादाशी संबंधित व्हिडीओज, मजकूर आदी तांत्रिक पुरावेही जोडण्यात आले आहेत. हे पुरावे आम्ही आरोपींच्या मोबाइल हँडसेट्समधून मिळविले आहेत. या तीन आरोपींवर एटीएसने भारतीय दंड संहितेचे कलम ३०७, ३३२, ३३३, १५३, ३५३, १८६, १०९, १२० (बी), शस्त्रास्त्र कायद्याचे कलम ४ आणि २५ आणि बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याचे (यूएपीए) कलम १६ आणि १८ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे.