शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नागपूर उन्हाळी विशेष गाडीच्या वेळापत्रकात बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:36 IST

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या उन्हाळी साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मुंबई  - मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या उन्हाळी साप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ही गाडी ५ मे पासून ते ३० जूनपर्यंत उपरोल्लेखीत मार्गावर धावणार असून, प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.या गाडीचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना दुसऱ्या मेल, एक्स्प्रेसमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. ज्यांना प्रवास करायचा नाही, त्यांना नियमानुसार तिकिटाची रक्कम परत देण्यात येईल. या वेळापत्रकात बदल केलेल्या विशेष मेल, एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. गाडी क्रमांक ०१३९५ आणि ०१३९६ पुणे ते वलसाड द्विसाप्ताहिक विशेष मेल, एक्स्प्रेसला गर्दी नसल्याच्या कारणाने ही विशेष मेल, एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.नवे वेळापत्रक असे...गाडी क्रमांक ०२०२१ सीएसएमटी ते नागपूर साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक रविवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांऐवजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७४ नागपूर ते सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी रविवारी सायंकाळी ४ ऐवजी प्रत्येक सोमवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी नागपूरहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७५ सीएसएमटी ते नागपूर साप्ताहिक विशेष गाडी सोमवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांऐवजी प्रत्येक मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून २० मिनिटांनी सीएसएमटीहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०७६ नागपूर ते सीएसएमटी साप्ताहिक विशेष गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी ६ वाजून ५० मिनिटांऐवजी दुपारी ४ वाजता सुटेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMumbaiमुंबईnagpurनागपूर