शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अरुण जेटली यांच्या निधनामुळे महाजनादेश यात्रेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 3:03 PM

मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

खामगाव : माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. महाजनादेश यात्रा रविवार, २५ आॅगस्ट रोजी स्थगित केली असून. शनिवारी मा. मुख्यमंत्री यात्रेसाठी मूळ कार्यक्रमानुसार ठिकठिकाणी जमलेल्या लोकांना भेटतील पण कोणतीही भाषणे होणार नाहीत किंवा हार स्वीकारले जाणार नाहीत, असे यात्राप्रमुख प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव व शेगाव येथे येण्याचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर या ठिकाणी आता जाहीर सभा किंवा स्वागताचा कार्यक्रम होणार नाही.सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, अरुण जेटली यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर मा. मुख्यमंत्र्यांनी अरुण जेटली यांना श्रद्धांजली अर्पण करून यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी केवळ लोकांना भेटतील. पण कोठेही स्वागताचे कार्यक्रम होणार नाहीत तसेच हारफुले स्वीकारण्यात येणार नाहीत. महाजनादेश यात्रा रविवारी पूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे. सोमवारी मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाईल.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राArun Jaitleyअरूण जेटलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkhamgaonखामगाव