शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

महाराष्ट्रात मार्चमध्ये सत्तांतर?; नारायण राणेंचं 'ते' वाक्य ऐकून सगळ्यांचेच कान टवकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:24 IST

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील नियोजित सर्वच कार्यक्रम सोडून ते दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे, पवारांच्या दिल्ली दौऱ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केला आहे."लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल. तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे तोदेखील दिसून येईल. मार्च महिन्यापर्यंत बदल दिसून येतील," असं नारायण राणे यावेळी म्हणाले. "जे काही आहे ते सर्व आता सांगता येणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार स्थापन करायचं असेल तर गोष्टी या गुप्त ठेवाव्याच लागतात," असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.शरद पवारही दिल्लीला रवानाकाहीही झालं तरी हे सरकार ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल अशी ग्वाही महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार आणि शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्याकडून देण्यात येते. मात्र, पहाटेच्या शपथविधीमुळे राजकारणातील अनिश्चितता सातत्याने वेगळ्या चर्चा घडवून आणते. आता, शरद पवार अचानक दिल्लीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी काळात होत असलेल्या ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांसंदर्भात हा दिल्ली दौरा आहे का, आणखी काही वेगळेच कारण आहे, याची चर्चा होत आहे. मात्र, शरद पवार यांचा हा दिल्ली दौरा नियोजित होता, त्यात तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीही दिल्लीत आहेत. त्यामुळे, काँग्रेसच्या हायकमांड सोनिया गांधी यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यासाठीच, शरद पवार दिल्लीला रवाना झाले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधी सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtraमहाराष्ट्रMahavikas Aghadiमहाविकास आघाडी