शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शहराचे नाव बदलायचे? राजकीयच नव्हे, तर पैशांचाही असतो प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 08:34 IST

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले या शहरांचे नामांतर अखेर पूर्णत्वास गेले आहे.

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने शुक्रवारी मंजुरी दिली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले या शहरांचे नामांतर अखेर पूर्णत्वास गेले आहे. कोणत्याही शहराचे नाव बदलण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विशिष्ट प्रक्रिया पूर्ण करावी लागते. प्रत्यक्ष नामांतर पूर्ण होईपर्यंत या प्रक्रियेवर २०० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च येतो. 

नामांतराच्या बाबतीत कोण आघाडीवर?  उत्तर प्रदेशात शहरांची नावे बदलण्यावरून सर्वाधिक वाद निर्माण झाले असले, तरी नावे बदलण्याच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर नाही. आंध्र प्रदेशात सर्वाधिक ७६ नावे बदलली आहेत. तामिळनाडूने ३१ तर महाराष्ट्राने १८ ठिकाणांची नावे बदलली आहेत.

प्रक्रिया कशी असते?कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळाला असतो. साधारणपणे शहरातील लोकांनी यासंदर्भात मागणी केली तरच या प्रस्तावावर विचार सुरू केला जातो. एखादा आमदाराच्या मागणीवरूनही सरकार मंत्रिमंडळासमोर शहराचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आणू शकते. मंत्रिमंडळाने शहराचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर राज्याची विधानसभा त्यावर शिक्कामोर्तब करते. नंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविला जातो. यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय या प्रस्तावावर संबंधित मंत्रालये आणि विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेते. यात रेल्वे, टपाल विभाग, रस्ते वाहतूक मंत्रालय आदींचा समावेश असतो. प्रत्येक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर गृह मंत्रालय संबंधित प्रस्तावाला मंजुरी देते व नावातील बदल लागू होतो. 

कशासाठी, किती खर्च येतो? एखाद्या शहराचे नाव बदलण्यासाठी २०० ते ३०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. शहर मोठे असेल तर हा खर्च १००० कोटींच्या घरात जाऊ शकतो. 

सरकारी स्टेशनरीमध्ये करावा लागतो बदल 

शहरातील सर्व सार्वजनिक सूचना फलक, रेल्वे तसेच बस स्थानकांवरील फलक, मार्गांवरील फलक बदलण्याचा खर्च शेजारी असलेल्या राज्यांमध्ये असलेले फलक देखील बदलावे लागतात.

आंध्र प्रदेश      ७६ तामिळनाडू      ३१ केरळ      २६ महाराष्ट्र      १८ कर्नाटक      १४ मध्य प्रदेश      १३ गुजरात      १२ प. बंगाल     ९उत्तर प्रदेश     ८तेलंगणा     ८हरयाणा     ६पंजाब     ४राजस्थान     ४आसाम     ३गोवा     ३ओडिशा     २पद्दुचेरी     २हिमाचल      २छत्तीसगड     १मिझोराम     १नागालँड     १

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद