शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

२०२४ मध्ये राज्यात भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून आणणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं लक्ष्य

By गणेश वासनिक | Updated: August 12, 2022 23:01 IST

Chandrasekhar Bawankule: येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केला.

- गणेश वासनिकअमरावती : येत्या २०२४च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४५ प्लस खासदार निवडून येतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केला. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविल्याने भाजप हा घराणेशाहीचा पक्ष नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

बावनकुळे हे अमरावतीत जिल्हा भाजपच्या बैठकीसाठी आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडी सरकारने गत अडीच वर्षांत केवळ मंत्र्यांच्या हितासाठीच काम केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४० दिवसांत ५० कॅबिनेटचे निर्णय घेतले. एनडीआरअंतर्गत शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत थेट खात्यात जमा केली. विदर्भ, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ दिली. शिंदे, फडणवीस सरकार येत्या दोन वर्षांत जनतेच्या हितासाठी काम करील, जेणेकरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंड दाखविण्यास जागा ठेवणार नाही, असा टोलादेखील त्यांनी लगावला. भाजप आणि शिंदेसेना यांच्या युतीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जातील, असे ते म्हणाले.

अमरावतीत ‘हर घर तिरंगा’ प्रचार रथाचे पोस्टर फाडणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पोस्टरला काळे फासण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली. पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, आमदार रणजित पाटील, आमदार प्रताप अडसड, भाजपचे नेते चैनसुख संचेती, निवेदिता चौधरी, किरण पातुरकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, आदी उपस्थित होते. पंकजा मुंडे केवळ माध्यमांसाठी नाराजपंकजा मुंडे या भाजपच्या केंद्रीय सरचिटणीस आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने त्या नाराज असल्याच्या बातम्या केवळ माध्यमांत आहेत. मी स्वत: त्यांच्याशी गुरुवारी बोललो आहे. त्या नाराज नाहीत. भाजप हा संघटनात्मक पक्ष आहे. पक्षनेतृत्वाच्या आदेशाचे पालन करावे लागते, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 खरी शिवसेना ही शिंदे यांचीचआमदार, खासदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे शिवसेना ही शिंदे यांचीच आहे. भविष्यातही शिवसेनेचे नेतृत्व शिंदे यांच्याकडेच असेल, असा दावा बावनकुळे यांनी केला. राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका भाजप व शिंदे शिवसेना सोबत लढणार असेही ते म्हणाले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाAmravatiअमरावती