शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मी आव्हान दिल्यामुळेचं चंद्रकांत पाटील कोल्हापूर सोडून पुण्याला गेले: राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:33 IST

पुण्यातील कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: पुण्यातील कोथरूड मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, चंद्रकांत पाटील ग्रामीण मतदारसंघातून निवडणुक लढणार असतील तर त्यांच्याविरोधात मी लढण्याची घोषणा केल्यानेच चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत टीका केली आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुण्यातील ब्राम्हण महासंघाकडून विरोध होतो आहे. त्यामुळे पुण्यातील ब्राम्हण महासंघाने मला चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध  निवडणूक लढवण्यासाठी मला निमंत्रण दिलं आहे. मात्र मी हे निमंत्रण स्वीकारले नाही, असं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून प्रदेशाध्यक्ष आहे. ते आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिमंडळात 'नो एन्ट्री' या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागत आहे. त्यानुसार त्यांनी कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे. कोथरूड मतदार संघातून पाटील यांचे नाव निश्चित झाल्यानंतर मतदार संघातील लोकांनी विरोध दर्शविला होता. तसेच ब्राह्मणच उमेदवार हवा, अस सांगत मेधा कुलकर्णी यांनाच पाठिंबा दर्शविला होता. त्यातच कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलRaju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाPuneपुणे