शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांमध्ये रोष; उद्धव ठाकरेंचा अपमान सहन करणार नाही: चंद्रकांत खैरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 15:20 IST

शिवसैनिकांमध्ये चीड असून, ते नाराज असल्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे हे लोकमतशी बोलताना म्हणाले.

मुंबई - अजित पवार यांनी रात्री उशिरा भाजपासोबत हातमिळवणी करुन सत्तेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत ८ आमदार शपथविधीला उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना शपथ दिली. मात्र त्यानंतर आता शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर उद्धव ठाकरेंचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी लोकमतला दिली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून राज्यात रोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहे. काळ रात्रीपर्यंत महाशिवआघाडीचं सरकार येणार असल्याचे चित्र असताना, आज सकाळी फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनतर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या भूमिका ही वैयक्तिक असून ही पक्षाची भूमिका नसल्याचे म्हंटले आहे.

तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या आहे. तसेच या मुद्यावरून शिवसेनामध्ये सुद्धा नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढे काय भूमिका घ्यायची यासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत असून  शिवसैनिकांमध्ये प्रचड रोष असल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले आहे.

आज सर्व माध्यमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बातम्या छापुन आल्या होत्या. मात्र त्यानंतर जे राजकीय घडामोडी घडल्या आहेत, ते पाहता हे उद्धव ठाकरे यांचा अपमान आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांचा अपमान कधीही सहन करणार नाही. तसेच शिवसैनिकांमध्ये चीड असून, ते नाराज असल्याचे सुद्धा चंद्रकांत खैरे हे लोकमतशी बोलताना म्हणाले.