शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राबाबू नायडू यांनी घेतली गडकरींची भेट, आंध्र प्रदेशमधील सिंचन प्रकल्पांना गती देण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 22:20 IST

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

नागपूर : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आंध्र प्रदेशमधील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसंदर्भात नायडू यांनी गडकरी यांच्यासोबत चर्चा केली. या सिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी व गडकरी यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.रात्री ८ च्या सुमारास चंद्राबाबू नायडू गडकरी यांच्या भक्ती या निवासस्थानी आले. यावेळी त्यांच्यासमवेत आंध्र प्रदेशचे जलसंपदामंत्री डी. उमा महेश्वर राव हेदेखील होते. मागील आठवड्यात विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नितीन गडकरी आंध्र प्रदेशमध्ये होते. यावेळीच मंगळवारच्या बैठक निश्चित करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.आंध्र प्रदेशमधील पोलावरम् हा राष्ट्रीय सिंचन प्रकल्प प्रलंबित आहे. हा सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा आंध्र प्रदेश शासनाचा मानस होता. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात यावी, अशी विनंती चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी केली. सोबतच आंध्रप्रदेशातील गुंडलाकामा, ताडीपुडी एलआसएस, थोतापल्ली, ताराकरम तीर्त सागरम, मुसुरुमिल्ली, पुष्कर एलआयएस, येराकल्वा आणि मादिगेडा या प्राधान्य-२ गटामधील प्रकल्पांच्या पूर्ततेसंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.गडकरी चांगले काम करत आहेतपोलावरम् प्रकल्प आंध्र प्रदेशच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यासाठी मी आलो होतो. त्यांना या प्रकल्पाची सखोल माहितीदेखील दिली. नितीन गडकरी यांच्या कामाशी शैली प्रभावित करणारी आहे. ते खूप चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन चंद्राबाबू नायडू यांनी केले.भाजप आमदारांनी केले स्वागतदरम्यान, भाजपचे आमदार व पदाधिकाºयांनी चंद्राबाबू नायडू यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. भाजप शहराध्यक्ष व आ.सुधाकर देशमुख, आ.विकास कुंभारे, आ.डॉ मिलिंद माने, भाजपा शहर महामंत्री किशोर पलांदुरकर प्रामुख्याने उपस्थित होते.