शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या; मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 15:10 IST

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते आज मुंबईत महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलच्या ऑनलाइन कार्यशाळेच्या उदघटनावेळी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी कोरोना संदर्भातील उपचार पद्धतींवर भाष्य केलं. "राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे कुटुंबियांची काळजी घ्या आणि पावसाला येतोय तर याकाळात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे. राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. कोरोनावरील उपचारांबाबत आता औषधांचा अतिवापर देखील घातक ठरत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे औषधांचा अनाठायी वापर आपण टाळायला हवा", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

कोरोनाचा आजार अंगावर काढू नकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोना आजाराबाबत आता अधिक सतर्क राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे असं सांगताना कोरोनाचा अंगावर अजिबात काढू नका असं आवाहन केलं आहे. "कोरोना हा आजार अजिबात अंगावर काढू नका. हा आजार इतर आजारांसारखा नाही. वेळीच उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतंही औषध घेऊ नका", असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. 

बुरशीजन्य आजारांवर उपचारपद्धती निश्चित कराराज्यात आता कोरोनानंतर बुरशीजन्य रोगाचा प्रसार वाढतो आहे. यामागे औषधांचा अतिवापर हे महत्वाचं कारण असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असं व्हायला नको. बुरशीजन्य आजारांवर देखील आता उपचारपद्धती निश्चित व्हायला हवी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv Senaशिवसेना