शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात उद्या पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 21:42 IST

दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र 

पुणे : दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र गुरुवारी तयार होत असून त्याचे २१ नोव्हेंबर रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, अंदमान, निकोबार परिसरात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.१९ नोव्हेंबरला दक्षिण अरबी समुद्राच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पश्चिम वायव्यच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळ, लक्ष्यद्वीप परिसरात १९ नोव्हेंबरला तसेच अंदमान, निकोबार बेटाच्या समुहात २० ते २२ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूत ईशान्य मॉन्सूनचा जोर २२ नोव्हेंबरनंतर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ३६.२ अंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १७.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.राज्यात १९ व २० नोव्हेंबर रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १९ नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात १९ व २० नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा  पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.