शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र मराठे यांच्या जामिनाला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 06:35 IST

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आरोपी असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.

मुंबई : बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आरोपी असलेले बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्या जामिनावरील सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने मराठे यांना सोमवारी नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.डीएसके यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी मराठे यांच्यासह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुणे आर्थिक अन्वेषण विभागाने जूनमध्ये अटक केली. त्यानंतर काही दिवसांतच पुणे एमपीआयडी न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली. डीएसकेंच्या विविध योजनांत गुंतवणूक करणाºया प्रज्ञा सामंत यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात अ‍ॅड. संदीप कर्णिक यांच्यामार्फत आव्हान दिले. न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती.रवींद्र मराठे यांना न्यायालयाने सुनावलेली पोलीस कोठडी संपते ना संपते तोच तपास अधिकाºयाने पुढील तपासासाठी त्यांच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगणे, न्यायालयाला सुटी असताना अर्ज करणे, मराठे यांनी तातडीने जामीन अर्ज दाखल करणे, या घटना संशयास्पद आहेत. अशी तत्परता सामान्य आरोपीसाठी दाखवली गेली नाही. सर्व प्रक्रिया डावलून डीएसकेंना नियमबाह्य कर्ज देण्यात मराठे यांचाही हात आहे. त्यामुळे जामीन रद्द करावा, अशी विनंती याचिकेत आहे. न्या. जाधव यांनी याची दखल घेत मराठे यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या