शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव बीडीओ आत्महत्येचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा, सभापती, उपसभापतींसह कर्मचा-यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 12:10 IST

विष प्राशन करीत  आत्महत्येच्या प्रयत्न करणारे चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी  शनिवारी दिलेल्या जबाबानुसार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम

चाळीसगाव : विष प्राशन करीत  आत्महत्येच्या प्रयत्न करणारे चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी  शनिवारी दिलेल्या जबाबानुसार ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजीव निकम, सभापती स्मितल दिनेश बोरसे, त्यांचे पती दिनेश पुरुषोत्तम बोरसे, उपसभापती संजय भास्कर पाटील,  पं.स. सदस्य कैलास चिंतामण पाटील, सुनिल साहेबराव पाटील यांच्यासह कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी के.व्ही. मालाजंगम, सहाय्यक परिक्षेत्र अधिकारी आर.डी. महिरे अशा आठ जणांविरुद्ध कलम ५०६, ३४ अनुसुची जाती - जमाती प्रतिबंधक कायदा ३ (एमआर) प्रमाणे शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून डीवायएसपी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पो.नि. राजेश घोळवे पुढील तपास करीत आहे.चौकशी समिती आज घेणार उलट तपासणी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय समितीने शनिवार पासून पंचायत समितीतील ३६ कर्मचा-यांची चौकशी सुरु केली असून रविवारी दुपार पासून उलट तपासणी होणार आहे. समितीचे अध्यक्ष उपायुक्त सुखदेव बनकर हे आज येणार आहे. शनिवारी ते उपस्थित नव्हाते. पं.स.च्या अस्थापनेवर एकुण ७६ कर्मचारी आहेत. मात्र गुरुवारी झालेल्या मासिक सभेच्या दिवशी ३६ कर्मचारी हजर होते. याच कर्मचा-यांची चौकशी होणार असून बीडीओ वाघ यांनी गुरुवारीच दुपारी दोन वाजता आपल्या केबिनमध्ये विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बीडीओ वाघ यांनी लिहिलेली पाच पानी सुसाईटनोटही पोलिसांनी जप्त केली आहे. या नोट मध्ये त्यांनी पं.स.च्या काही कर्मचा-यांचीही नावे नोंदवली आहेत. कर्मचा-यांनी सादर केले लेखी जबाब शनिवारी समितीच्या सहा सदस्यांसमोर एकुण ३६ कर्म-यांनी स्वहस्तक्षरात लिहिलेले लेखी जबाब सादर केले आहे. यावरच रविवारी सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत उलट तपासणी होणार आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच पं.स.मध्ये वर्दळ दिसून आली. पं.स.च्या दोन मासिक सभांचे इतिवृत्तही तपासले जाणार आहे. उपायुक्त अध्यक्षतेखालील समितीची चौकशी नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त सुखदेव बनकर यांच्या अध्यक्षतेखाली विक्रांत बागडे ( प्रकल्प संचालक, जळगाव),  प्रमोद पवार (जिल्हा ग्रामीण विकास, नाशिक), राजेश देशमुख (तपासणी आयुक्तालय, नाशिक), चंद्रकांत वानखेडे (सहाय्यक संचालक, नाशिक), शरद पवार (सहाय्यक प्रशासन अधिकारी, नाशिक), प्रदीप पवार (अव्वल कारकुन, आयुक्तालय, नाशिक) यांचा समिती मध्ये  समावेश आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या