शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानांतर्गत चाकण नगर परिषदेचे होणार सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 20:14 IST

स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

चाकण : स्वच्छ भारत अभियान ( नागरी ) अंतर्गत केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जानेवारी 2018मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामध्ये प्रथम टप्प्यात काही निवडक शहरांचा समावेश करण्यात आलेला होता, परंतु आता भारतातील सर्वच शहरांचा या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चाकण स्वच्छ शहर या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. नुकतेच केंद्र शासनाकडून ( क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया ) झालेल्या तपासणीत चाकण शहर हागणदारी मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिली.या अभियानात शहरातील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नाही, अशा कुटुंबीयांना शौचालयाची वैयक्तिक अथवा सामुदायिक सुविधा उपलब्ध करून देऊन शहर हागणदारीमुक्त करणे तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन नियम 2016नुसार निर्मितीच्या जागी कचरा विलीनीकरण करण्याची जबाबदारी ही संबंधित कचरा निर्माणकर्त्यांची आहे.कचरा निर्मितीच्या जागी कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करून या विभागीकृत कचऱ्यावर केंद्रित अथवा विकेंद्रित पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी चाकण नगरपरिषदने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने त्याचे घर व घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवून कचरा नगर परिषदेच्या घंटा गाडीतच टाकावा व शहर स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा मंगल गोरे, आरोग्य समितीचे सभापती धीरज मुटके व मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणे