चैत्र चटका!

By Admin | Published: March 28, 2017 04:15 AM2017-03-28T04:15:35+5:302017-03-28T04:15:35+5:30

गुजरातवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत असून, हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची

Chaitra click! | चैत्र चटका!

चैत्र चटका!

googlenewsNext

सचिन लुंगसे / मुंबई
गुजरातवर निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात उष्ण वारे वाहत असून, हवेतील सापेक्ष आर्द्रता कमालीची कमी झाल्याने अवघ्या राज्यात चैत्र महिन्यातच उन्हाचे चटके जाणवत आहेत. मुंबईत समुद्रामुळे आर्द्रता अधिक असते मात्र येथील हवासुद्धा कोरडी झाल्याने मुंबईकरांच्या जिवाची काहिली होत आहे. राज्यात सोमवारी बहुतांश भागांतील कमाल तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसची मजल मारली.
पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या संपूर्ण भागात, मध्य महाराष्ट्र व कोकण-गोव्याच्या काही भागांत आणि विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
पुढील ४८ तासांसाठी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, असे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले.

महाड ४३, ठाणे ४४ अंशावर
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी ४३ अंश तापमानाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यातही पारा ४४ अंशांवर गेला.

बाष्पीभवनासह आर्द्रतादेखील तापमान वाढीसाठी कारण ठरत आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार, मुंबईचे कमाल तापमान ३५ अंश आहे. मात्र कोरड्या हवेमुळे त्याचा प्रत्यक्ष दाह तब्बल
४२ अंश सेल्सिअस आहे.
- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

यंदा सरासरी ९५ टक्के पाऊस : जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात देशभरात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने व्यक्त केला आहे़ त्यात ५ टक्के कमी-अधिक फरक पडू शकतो़ देशभरात ८८७ मिमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ एलनिनोचा प्रत्यक्ष प्रभाव जुलैनंतर जाणवण्याची शक्यता आहे. जूनमध्ये १०२, जुलैमध्ये ९४, आॅगस्टमध्ये ९३ तर सप्टेंबरमध्ये ९६ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Web Title: Chaitra click!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.