शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

जातवैधता प्रमाणपत्र कधीही काढता येईल, वर्तमानातील उद्देशाचे बंधन नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 01:02 IST

सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

- राकेश घानोडे 

नागपूर : भूतकाळात पूर्ण झालेल्या अथवा भविष्यातील इच्छित उद्देशाकरिता जातवैधता प्रमाणपत्र मिळविले जाऊ शकते. जातवैधता प्रमाणपत्रासाठी दावा दाखल करतेवेळी संबंधित उद्देश अस्तित्वात असला पाहिजे असे बंधन जात प्रमाणपत्र कायद्याने घालून दिलेले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.सरकारी नोकरी, शैक्षणिक प्रवेश इत्यादी ठिकाणी जातीच्या आधारावर मिळणाऱ्या आरक्षणाचा व इतर लाभ घेण्यासाठी आणि अन्य विविध उद्देशांकरिता जातवैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जातवैधता प्रमाणपत्र हे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीद्वारे जारी केले जाते. त्याकरिता समितीकडे दावा दाखल करावा लागतो.परंतु, समिती, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याचा उद्देश वर्तमानकाळात अस्तित्वात असेल तरच, दावा विचारात घेऊन कायद्यानुसार आदेश जारी करते. अन्यथा दाव्यावर विचार केला जात नाही. राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या सुरुवातीपासून याच पद्धतीचे पालन करीत होत्या. उच्च न्यायालयाने ही पद्धत बेकायदेशीर ठरवली आहे. त्यामुळे समितीला कायदेशीर उद्देशाकरिता दाखल केला जाणारा जात वैधता प्रमाणपत्राचा प्रत्येक दावा विचारात घ्यावा लागणार आहे.‘या’ प्रकरणात दिला निर्वाळाअनुसूचित जमातीमधील हलबा जातीचे प्रमाणपत्र असताना नागपूर सरगम पराते हिने बी.डी.एस. अभ्यासक्रमात खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेतला आहे. परंतु, भविष्यात तिला शिक्षणामध्ये अनुसूचित जमातीचे लाभ घ्यायचे आहेत. त्यामुळे तिने फेब्रुवारी-२०२० मध्ये अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्राकरिता दावा दाखल केला होता. परंतु, उद्देश वर्तमानकाळातील नसल्यामुळे तिचा दावा अमान्य करण्यात आला होता. त्याविरुद्ध तिने याचिका केली होती. सरगमतर्फे अ‍ॅड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय