शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

मध्य रेल्वे कोलमडली; प्रवाशांचे ‘मेगा’हाल!

By admin | Updated: May 26, 2016 04:27 IST

शीव, विक्रोळी स्थानकांवर एकानंतर एक झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी रात्री सुमारे तीन तास पूर्णपणे ठप्प झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास सुरू झालेल्या

मुंबई : शीव, विक्रोळी स्थानकांवर एकानंतर एक झालेल्या तांत्रिक बिघाडांमुळे मध्य रेल्वेची वाहतूक बुधवारी रात्री सुमारे तीन तास पूर्णपणे ठप्प झाली. रात्री सव्वा आठच्या सुमारास सुरू झालेल्या या गोंधळामुळे रेल्वे मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या आणि घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोकलमधील दिवे आणि पंखेही बंद पडल्याने त्यात आणखी भर पडली. रेल्वे वाहतूक कोलमडल्याने अनेकांनी बस, टॅक्सीचा पर्याय निवडल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. प्रथम शीव स्थानकाजवळील चारही मार्गांवरील ओव्हरहेड वायरमध्ये रात्री ८.0६ च्या बिघाड झाला आणि लोकल वाहतूक खोळंबली. त्यामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या लोकल जागीच थांबल्या. याचबरोबरच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर असलेल्या एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्येही तांत्रिक समस्या उद्भवली आणि या गोंधळात आणखी भर पडली. त्यानंतर विक्रोळी स्थानकाजवळ रात्री सव्वा आठच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. हा बिघाड सहा मार्गांवर झाल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे पुरते तीन तेरा वाजले. मेल-एक्सप्रेस गाड्या हळूहळू सुरु करण्यात आल्यानंतर लोकलच्या अन्य चारही मार्गांवरील लोकल सेवा ठप्पच झाली होती. जवळपास एक तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यानंतरही लोकल पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी रुळावरून चालणे पसंत केले. काही स्थानकांवर तांत्रिक बिघाडाची माहिती देत असल्याने आणि लोकल तासनतास पुढे सरकत नसल्याने प्रवाशांनी टॅक्सी, रिक्षांचा पर्याय निवडला. मस्जिद ते दादर स्थानकापर्यंत एकही लोकल येत नसल्याने या स्थानकांवर हजारो प्रवाशांची गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत हीच परिस्थिती सर्व स्थानकांवर होती. शीव येथील बिघाड रात्री ८.४० च्या सुमारास दुरुस्त करण्यात आले. विक्रोळी येथील सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.मध्य रेल्वे बंद पडल्याने अनेकांनी हार्बर मार्गावरून वाशी गाठले व तेथून बसने ठाणे, कल्याण-डोंबिवली असा प्रवास करत घर गाठले. रात्री उशीरापर्यंत खोळंबाच...मध्य रेल्वेच्या मेन लाईवर झालेल्या दोन तांत्रिक बिघाडांमुळे विस्कळीत झालेली रेल्वे सेवा रात्रभर विस्कळीत होती. रात्री अकरा वाजल्यानंतर मध्य रेल्वेच्या चार मार्गांवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आली. मात्र त्यावेळीही लोकलचा वेग मंदावलेलाच होता. परिणामी दोन रेल्वे स्थानकांमध्ये अडकलेल्या बहुतेक रेल्वे प्रवाशांनी पुढील स्थानकावर उतरणे पसंत केले. शिवाय स्थानकाबाहेर पडत बस, रिक्षा आणि टॅक्सीच्या मदतीने इच्छितस्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला.