बारामती: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सध्यादेखील राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सप्टेंबरपासून केंद्रानं महाराष्ट्राला एकही पीपीई किट दिलेलं नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून केलेल्या अर्जातून हा तपशील समोर आला आहे. (Central government not provided single PPE Kit to Maharashtra Since September)सहा कोटी लोकांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार पीएफवरील व्याज दर निश्चित करण्याची शक्यताबारामती तालुक्यातल्या सोमेश्वरनगरमध्ये वास्तव्यास असलेले माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी आरटीआयच्या अंतर्गत एक अर्ज केला होता. अनेकदा पत्रव्यवहार करूनही आणि इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना संकटाची तीव्रता अधिक असूनही केंद्रानं महाराष्ट्राला मदत करताना हात आखडता घेतल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. टीव्ही ९ नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
केंद्रानं गेल्या ६ महिन्यात महाराष्ट्राला किती पीपीई किट दिले; आकडा पाहून धक्का बसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 16:41 IST