शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मनोरा आमदार निवास : आमदारांना पर्यायी व्यवस्था करुन द्या - अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 16:38 IST

विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते.

मुंबई, दि. 31 - विधानसभेमध्ये विरोक्ष पक्षातील नेत्यांनी दक्षिण मुंबईतील मनोरा आमदार निवासाचा मुद्दा मांडला. मनोरा आमदार निवासातील सुरक्षेच्या मुद्यावरुन विरोधक सभागृहात आक्रमक झाले होते. सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास मनोरा आमदार निवासातील 12 व्या मजल्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील खोलीतील छत कोसळले. याप्रकरणी आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोसळलेल्या छताचा तुकडा सोमवारी (31 जुलै) सभागृहात आणला व आमदारांना पर्यायी व्यवस्था करुन देण्याची मागणी केली.  

काय आहे नेमके प्रकरण?मुंबईतील मनोरा आमदार निवासमध्ये एका खोलीचे छत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. सतीश पाटील हे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल-पारोळामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक 112 मध्ये राहतात. अँटी चेंबरमधील पीओपीसहित छत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.   सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

दक्षिण मुंबईत विधान भवन परिसरात मनोरा आमदार निवास आहे.  सुमारे 20 वर्षांपूर्वी मनोर आमदार निवास बांधण्यात आले आहे. वर्षाभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या पाहणीतही इमारती केव्हाही धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेमुळे मनोरा आमदार निवासाच्या दुरूस्तीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.  

नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती 1996 साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या 20 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम सध्या खराब झाले आहे.  सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत आहेत.