शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीवर सीसीटीव्हीचा वॉच; गैरव्यवहारांच्या आरोपानंतर सरकारला आली जाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 06:03 IST

३१ जानेवारीची डेडलाइन. एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात  केला होता.

नारायण जाधवलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळीवाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर असे गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांनी ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे  आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून सरकारच्या दलालांनी शिवभोजन थाळी योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी मुंबईत नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात  केला होता. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठीच शिवभोजन योजना सुरू केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावे योजनेत भ्रष्टाचार होत असून, हा महाराजांचा अपमान असल्याचे सांगून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळात वाभाडे काढले होते.

शिवभोजन केंद्रचालकांनी स्वखर्चाने हे कॅमेरे बसवायचे आहेत. याबाबत राज्य शासनाचे आदेश नुकतेच प्राप्त झाले असून, त्यानुसार ठाणे जिल्ह्यात त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे.  -राजू थोटे,  जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे जिल्हा.

अधिकाऱ्यांवर सोपवली जबाबदारीविभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत किंवा नाही,  याची तपासणी करून कार्यवाही करावी. शिवभोजन केंद्राचे देयक देताना तक्रार आल्यास  सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. तक्रारीवर अंतिम आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या निर्देशानुसार शिवभोजन थाळीत खाद्यपदार्थ मिळतात का, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का, हेही यानिमित्ताने तपासता येणार आहे.

हे आहेत आदेशnप्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे  बसवावेतnकेंद्राच्या क्षमतेनुसार त्यांची संख्या असावीnप्रत्येक कॅमेऱ्यात शिवभोजन दिसायला हवे

nकेंद्रचालकाने कमीतकमी ३० दिवसांचे फुटेज तपासणीसाठी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावीnआवश्यकता भासेल तेव्हा हा सर्व डाटा तपासणीसाठी पेन ड्राइव्हमधून अधिकाऱ्यांना द्यावाnवीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अखंड फुटेज मिळेल, याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्रचालकाची राहील.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय