शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकारी शाळांमध्ये आता CBSE अभ्यासक्रम; शिक्षणमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:40 IST

राज्यातील शाळांमध्ये आता सीबीएसई अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार, याबद्दलची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली. 

MSBSHSE CBSE syllabus: राज्यात जिल्हा परिषद शाळांसह इतर शासकीय शाळांमध्ये लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २०२५-२०२६ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश केला जाणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी (२० मार्च) विधान परिषदेमध्ये दिली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना याबद्दलचा प्रश्न विचारला होता. राज्यात इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत राष्ट्रीय शिक्षण धोरणांनुसार केंद्रीय शिक्षण माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली आहे का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

कधीपासून लागू होणार?

 राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्याला शालेय शिक्षण विभागाशी संबंधित सुकाणू समितीने मान्यता दिली आहे, असे दादा भुसे यांनी लेखी उत्तरात सांगितले. सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. १ एप्रिलापासून सत्राची सुरूवात करण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्र्यांकडूनही सूचना

दादा भुसे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रालयातील सर्वच विभागांसाठी १०० दिवसांच्या कामांचा अजेंडा देण्यात आला आहे. त्याचा आढावा घेण्यात आला होता. राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा स्वीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारministerमंत्रीCBSE Examसीबीएसई परीक्षा