शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बोर्डाच्या शाळांत सीबीएसई अभ्यासक्रम, कुठलीही फी वाढ केली जाणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 06:30 IST

आपल्याला ३० टक्क्यांपर्यतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे. मराठी भाषेला यात प्राधान्य असेल...

मुंबई : राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील केवळ इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. पुढच्या वर्षी दोन टप्प्यांत दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी हा पॅटर्न लागू करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान भवनात पत्रकारांना दिली.

कुठलीही फी वाढ केली जाणार नाहीसीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासनाच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबविण्याबाबत आम्ही पुढे जाणार आहोत.

वर्षभरात शिक्षकांना प्रशिक्षित करणारसगळ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल केला तर त्यांना शिकविणारे शिक्षक यांनाही प्रशिक्षित करावे लागेल. वर्षभर त्याची तयारी करणार आहोत. वर्षभरात शिक्षक, अधिकारी यांना सीबीएसई पॅटर्नसाठी प्रशिक्षित करून पुढील वर्षी दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

मराठीमधूनच पुस्तके उपलब्ध असतीलआपल्याला ३० टक्क्यांपर्यतची स्थानिक सवलत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आहे. मराठी भाषेला यात प्राधान्य असेल. त्याप्रमाणेच अभ्यासक्रम केला जाईल. मराठीमधूनच पुस्तके उपलब्ध असतील. दुसऱ्या माध्यमाच्या शाळेतही मराठी ज्या पद्धतीने बंधनकारक आहे. तो शिकविण्यास लागणाऱ्या स्टाफकडे मराठी शिक्षणाची डिग्री असली पाहिजे अशी नियमावली असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणState Governmentराज्य सरकार