शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Anil Deshmukh: राज्य सरकारकडून ९ जूनपर्यंत कागदपत्रे मागणार नाही; CBI ची उच्च न्यायालयाला माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 21:47 IST

भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ जूनपर्यंत राज्य सरकारकडून  मागणार नाही, असे आश्वासन सीबीआयने उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. 

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भ्रष्टाचार, पोलीस बदल्या व बढत्यांप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या तक्रारीसंबंधीची कागदपत्रे ९ जूनपर्यंत राज्य सरकारकडून  मागणार नाही, असे आश्वासन सीबीआयने उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. 

सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी हे आश्वासन न्या. एस.जे. काथावाला व न्या. एस.पी. तावडे यांच्या खंडपीठाला दिले. भ्रष्टाचाराप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, या गुन्ह्यातील दोन परिच्छेदांवर राज्य सरकारने आक्षेप घेतला आहे. या परिच्छेदत नमूद करण्यात आलेल्या बाबींवर सीबीआयला तपास करू नये. उच्च न्यायालयाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार तपासणी करताना सीबीआयने तपासाची व्याप्ती वाढविली आहे. सीबीआय राज्य सरकारच्या प्रशासकीय कामांची चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली.

वादग्रस्त परिच्छेदांमध्ये सचिन वाझे यांना पोलीस सेवेत पुन्हा रुजू करण्यात आल्याबाबत नमूद करण्यात आले आहे. तर दुसऱ्या परिच्छेदात पोलीस काट्यात देण्यात येणाऱ्या बढत्या व बदल्यांबाबत उल्लेख करण्यात आला आहे. बुधवारच्या सुनावणीत एस. व्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, सीबीआय चौकशीचा आदेश देणाऱ्या मूळ खंडपीठापुढेच (मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांचे खंडपीठ) राज्य सरकारच्या या याचिकेवर सुनावणी घेण्यात यावी. न्यायालयानेही आपल्याला याबाबत हरकत नसल्याचे म्हटले. मात्र, तोपर्यंत सीबीआयने राज्य सरकारकडून कागदपत्रे मागू नयेत, असे आश्वासन सीबीआयने द्यावे, असे खंडपीठाने म्हटले.

'या याचिकेवरील सुनावणी अन्य खंडपीठ घेईपर्यंत आम्ही महाराष्ट्र सरकारकडून कागदपत्रे मागणार नाहीत. हे आश्वासन केवळ कागदपत्रांसंदर्भात आहे. तपसांदर्भात नाही ' असे सीबीआयने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने सीबीआयचे म्हणणे मान्य करत उच्च न्यायालयाच्या निबंधकांना ही याचिका मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषणMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकार