शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील घटनेच्या सीबीआय चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2023 15:59 IST

Nana Patole Criticize Central Government: मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे.

मुंबई - मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. टीव्हीवर पेपरमध्ये आपला फोटा कसा येईल याचीच त्यांना जास्त चिंता असते. मणिपूरमधील महिला अत्याचाराची चौकशी सीबीआय करणार असल्याचे समजते पण सीबीआय चौकशीतून काय होणार ? सीबीआय पुलवामा घटनेचीही चौकशी करत आहे, त्याचा अद्याप अहवाल आला का ? या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, त्यांचे काम कसे चालते हे सर्वांना माहित आहे, अशी टीका नाना पटोले  यांवी लगावला आहे.

मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. दरम्यान, या हिंसाचार प्रकरणी सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीबीआयने हिंसाचार आणि कटाशी संबंधित सहा एफआयआर दाखल केल्या आहेत. तसेच तपास यंत्रणांनी आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सीबीआय सामुहिक अत्याचार प्रकरणी नवी एफआयआर दाखल करणार आहे.

मणिपूरमध्ये ८६ दिवसांपासून हिंसाचार होत आहे. यादरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितले की, आम्ही मणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सचिव अजय कुमार भल्ला यांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने सुनावणी पूर्ण करण्यासाठी सुप्रिम कोर्टाकडून प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करण्याची विनंती केली आहे. 

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेManipur Violenceमणिपूर हिंसाचारCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेस