शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

उंदराला मांजर साक्ष! ससूनच्या डॉक्टरांची चौकशी करणारे डॉक्टर गंभीर प्रकरणांत अडकलेले; माजी सनदी अधिकाऱ्यांचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 11:00 IST

Pune Porsche Accident Case Update: शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी या मुख्य डॉक्टरांवर गंभीर आरोप केलेले. झगडेंनी त्यावरच बोट ठेवले.

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात सरकारी यंत्रणेचे पितळ उघडे पडलेले आहे. पोलीस, आमदार, डॉक्टर या यंत्रणा कशा या बिल्डर पुत्राला सोडविण्यासाठी कामाला लागलेल्या याचे एकेक पुरावे समोर येत आहेत. बिल्डरच्या बाळाने दारु पिलेली नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेऊन त्याचे सॅम्पल कसे बदलले, कचऱ्यात टाकले. त्यांना हे करण्यासाठी कोणा कोणाचे फोन आले आदी गोष्टी अगदी चवीने चर्चेत येत आहेत. सुरुवातीला ज्या पोलिसांनी त्या बिल्डर बाळाला सोडविण्याचा प्रयत्न केला तेच पोलिस प्रशासन आता त्यांच्यावर लागलेला बट्टा पुसण्याच्या कामी लागले आहेत. 

अशातच या ससूनच्या डॉक्टरांच्या चौकशीसाठी एक समिती बनविण्यात आली आहे. या समितीतील डॉक्टरांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यामुळे माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी या समितीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका डॉक्टरच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत त्यांनाच नेमल्याने झगडे यांनी उंदराला मांजर साक्ष अशी या समितीला उपमा देत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फेसबुकवर पोस्ट करत झगडे यांनी त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, असा टोलाही सरकार व प्रशासनाला लगावला आहे.

पोर्श-ससून या गंभीर प्रकरणात अडकलेल्या डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून "उंदराला मांजर साक्ष" ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर विनोदी वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा, अशा शब्दांत झगडे यांनी टोला लगावला आहे. 

जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, मुंबईतील डॉक्टर गजानन चव्हाण आणि छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर सुधीर चौधरी ही समिती नेमण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी सापळेंवर गंभीर आरोप केले होते. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना तसेच आता जेजे मधील भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप आहेत. यावरून झगडेंनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.  

टॅग्स :Pune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातsasoon hospitalससून हॉस्पिटल