शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओतील कथित घोटाळ्यांचे प्रकरण लोकायुक्तांकडून बंद; ठोस पुरावे नसल्याचा दिला अभिप्राय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 07:16 IST

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती.

मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परिवहन विभागातील कथित घोटाळ्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीत ठोस पुरावे नसल्याचा अभिप्राय देत लोकायुक्तांनी ते प्रकरण बंद केले आहे. आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या माध्यमातून परिवहन विभागात बदल्या आणि अन्य प्रकरणांत घोटाळे करण्यात आल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही त्यांच्याकडे सोमय्यांनी दिलेल्या तक्रारीची चौकशी करण्यास लोकायुक्तांना सांगितले होते. खरमाटे यांच्या अनुषंगाने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले होते. लोकायुक्त व्ही. एम. कानडे यांनी स्पष्ट केले की, सोमय्या यांचे म्हणणे मी विस्ताराने ऐकले आहे. सोमय्या यांनी एका निनावी पत्राचा आधार घेत आरोप केले होते. मात्र त्यातील आरोपांची पुष्टी होईल, असे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. परिवहन मंत्री अनिल परब, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य  आढळत नाही.  लोकायुक्तांनी असेही स्पष्ट केले की, या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे, सोमय्यादेखील उच्च न्यायालयात दाद मागू शकतात. शासनाकडून खरमाटे प्रकरणात खुली चौकशीबजरंग खरमाटे यांच्यासंदर्भात आलेल्या तक्रारीची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. लोकायुक्तांसमोरील सुनावणीदरम्यान राज्य शासनाकडून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे लवकरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणी चौकशी केली जाईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी